रामरक्षा शुद्धलेखन स्पर्धा

संस्कृतभाषासंस्था तर्फे रामरक्षास्तोत्रावर आधारित “रामरक्षा शुद्धलेखन स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे.

रामरक्षा शुद्धलेखन स्पर्धेचे स्वरूप

  • ही स्पर्धा शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व सर्व वयोगटातील प्रौढांसाठी खुली आहे.
  • सन्दर्भासाठी "रामरक्षास्तोत्रलेखनम्" PDF file (2 pages, A4size ) येथून Download करावी.
  • "रामरक्षास्तोत्रलेखनम्" PDF नुसारच लेखन अपेक्षित आहे. त्याची Print घ्यावी व लेखनाचा सराव करावा.
  • कालावधी: अदांजे १ - १.३० तास
  • प्रवेश शुल्क: ५०/-
  • पहिल्या तीन क्रमांकप्राप्त स्पर्धकांना बक्षिसे देण्यात येतील.
  • बक्षिसे पुस्तकरूपात देण्यात येतील.
  • काही उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.
  • बक्षिसांची संख्या स्पर्धकांच्या संख्येनुसार ठरविण्यात येईल.
  • लेखनात ८ पेक्षा अधिक चुका असल्यास ते लेखन, क्रमांकासाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही.
  • सर्वांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
  • स्पर्धा केंद्र : मुंबई, अलिबाग, पुणे व बदलापूर

रामरक्षा शुद्धलेखन विषयक सूचना

  • प्रत्येक श्लोकाचा आरंभीचा शब्द किंवा शब्दांश छापलेलाच आहे. त्याला जोडूनच पुढे लिहायचे आहे. पुन्हा तो शब्द लिहिण्याची आवश्यकता नाही.
  • प्रत्येक श्लोकाचा शेवटचा शब्द किंवा शब्दांश अगदी पुसट छापला आहे. लिहिताना त्यास जुळवून घेणे कधी कधी कठीण होते (बरेच अंतर राहते), म्हणून तो शेवटचा शब्द पुन्हा लिहिला तरी चालेल, किंबहुना लिहिणे बरेच.
  • दोन ओळीचा श्लोक असेल, तर पहिल्या ओळीशेवटी चरणदंड द्यावा. दुसर्‍या ओळीशेवटी दुहेरी चरणदंड छापलेलाच असल्याने पुन्हा द्यायची गरज नाही.
  • चार ओळींच्या श्लोकांत पहिल्या तीन ओळींअखेरीस सामान्यपणे एकेरी चरणदंड देतात/द्यावा. (त्यातील दुसर्‍या ओळीअखेर काही जण दुहेरी चरणदंड देतात. कसेही चालेल.) गुणांकन करताना चरणदंडाची बाब विचारात घेतली जाणार नाही.
  • विशेष जागा👉 श्लोक क्र. 30 मध्ये तिसऱ्या ओळीशेवटी ...दयालुर् इथे संधिकार्य असल्याने चरणदंड दिला नाही/ देऊ नये, कारण ते चौथ्या ओळीस जोडून सलग म्हणणे बरे. त्यास सयुक्तिक म्हणून पहिल्या ओळीअखेरही चरणदंड दिलेला नाही.
  • देवनागरीत शब्दांना अक्षरधारिणी / शीर्षरेखा असते. काहींना शीर्षरेखा न देता लिहिण्याची सवय असते. तसे लिहिले तर शब्द कुठे सुरू झाला आणि कुठे संपला, हे वाचणाऱ्यास कळावे , इतपत भान ठेवावे.

रामरक्षा शुद्धलेखन स्पर्धा 2022 निकाल

<

Prize Winner Centers

पुणे केंद्र विजेते स्पर्धक

मानसी सोनपेठेकर

प्रथमक्रमांक, पुणे केंद्र

स्वाती कानिटकर

द्वितीयक्रमांक, पुणे केंद्र

रीमा कुलकर्णी

तृतीयक्रमांक, पुणे केंद्र

अमृता लेले

तृतीयक्रमांक, पुणे केंद्र

बदलापूर केंद्र विजेते स्पर्धक

राधिका आपटे

प्रथमक्रमांक, बदलापूर केंद्र

सुमेधा गोळे

द्वितीयक्रमांक, बदलापूर केंद्र

अश्विनी केळकर

तृतीयक्रमांक, बदलापूर केंद्र

Contact

Sanskrit Bhasha Sanstha
201, Pitruchhaya, Plot No.83,
Sakharam Keer Marg,
Mahim (w),
Mumbai,
India-400016
Contact No: 098337 58745

Our Address

Sanskrit Bhasha Sanstha
201, Pitruchhaya, Plot No. 83,
Sakharam Keer Marg, Mahim (W),
Mumbai, India - 400 016

Email Us

संस्कृत भाषा संस्था
[email protected]

Call Us

संस्कृत भाषा संस्था
+91 9833 758 745

Loading
Your message has been sent. Thank you!