संस्थेचे उपक्रम
संस्कृत भाषा साधनावर्ग
संस्कृत भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्या सर्व आबालवृद्धांसाठी हे वर्ग मुंबईत दादर, अंधेरी, दहिसर, मुलूंड, ठाणे, बदलापूर इ. ठिकाणी चालविले जातात. ठराविक अभ्यासक्रम सहा महिन्यांत पूर्ण करुन, यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली जातात. यासाठी वयाची वा पूर्वज्ञानाची अट नाही. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला असून त्यातीलच काही संस्कृतप्रेमी या संस्थेमध्ये कार्यरत आहेत.
संस्कृत साहित्य साधना वर्ग
संस्कृत भाषा साधना उत्तीर्ण झालेल्यांसाठी वा शाळा कॉलेजमध्ये संस्कृतचे ज्यांनी अध्ययन केले आहे अशा व्यक्तींसाठी हे वर्ग चालविले जातात. सध्या हे वर्ग दादर व दहिसर येथे चालविले जातात व यांत संस्कृत माध्यमातून अध्यापन केले जाते. या वर्गात मेघदूत नीतिशतक, कादंबरी, भासाची नाटके, गीता इ. ग्रथांचा परिचय करुन देण्यात येतो. वरील दोन्ही उपक्रमांची व्याप्ती मुंबई व महाराष्ट्रात इतरत्रही वाढविण्यांसाठी संस्था प्रयत्नशील आहे.
संस्कृत भाषा (शिष्यवृत्ती) स्पर्धा परीक्षा
लहान वयातच संस्कृत भाषेची आवड निर्माण व्हावी यासाठी इ.५वी, ६वी व ७वी मधील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन दरवर्षी जानेवारी महिन्यातील प्रथम रविवारी केले जाते. प्रत्येक इयत्तेतील प्रथम तीन क्रमांकाना पारितोषिके दिली जातात. व सर्व उत्तीर्ण स्पर्धकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात येतात. या स्पर्धेचे आयोजन मुंबई, पुणे, अहमदनगर, सोलापूर, अंबरनाथ, सातारा इ.ठिकाणी केले जाते. - इतरत्रही स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
रामरक्षा प्रश्नोत्तर स्पर्धा
संस्कृतभाषासंस्थेतर्फ़े रामरक्षा– स्तोत्रावर आधारित “प्रश्नोत्तर स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा आबालवृध्दांसाठी खुली आहे. रामरक्षास्तोत्राच्या श्र्लोकांवर आधारित ही ५० प्रश्नांची (100 मार्कांची) ऑनलाईन परीक्षा आहे. ही मराठीत असून प्रत्येक प्रश्नासाठी उत्तरांच्या चार पर्यायांपैकी एक बरोबर पर्याय निवडायचा आहे. (Multiple Choice Question) अधिक माहितीसाठी रामरक्षा प्रश्नोत्तर स्पर्धा २०२४ येथे क्लिक करा.
भगवद्गीता पठण स्पर्धा
हा उपक्रम सर्वांसाठी खुला असून शालेय महाविद्यालयीन व प्रौढ अशा ३ गटांत त्याची विभागणी केली आहे. या उपक्रमासाठी संस्थापक श्री. ग. वा. करंदीकर यांनी गीतेतील निवडक १०० श्लोक असलेले भगवद्गीता स्वाध्याय हे पुस्तक व एक पुस्तिका संपादित केले आहे. गुरुपोर्णिमा व गीताजयंती या दोन दिवशी स्पर्धेचे आयोजन केले जाते.
रामरक्षा शुद्धलेखन स्पर्धा
संस्कृतभाषासंस्था तर्फे रामरक्षास्तोत्रावर आधारित “रामरक्षा शुद्धलेखन स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व सर्व वयोगटातील प्रौढांसाठी खुली आहे.अधिक माहितीसाठी रामरक्षा शुद्धलेखन स्पर्धा येथे क्लिक करा.
संस्कृतवार्तालापसभा
संस्कृतभाषासंस्थेद्वारा ' संस्कृतवार्तालापसभा ' हा नवा उपक्रम मार्च २०२३ पासून सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या दुस-या रविवारी संस्कृतवार्तालापसभा आयोजित केली जाईल. सभेसाठी एक विषय निश्चित केलेला असेल. सदर विषयावर आपण संस्कृत मध्ये ५ मिनीटे भाषण करावयाचे आहे. कोणीही संस्कृतप्रेमी या सभेस उपस्थित राहू शकतात. सभेसाठी कोणतेही शुल्क नाही.अधिक माहितीसाठी येथे 👉संस्कृतवार्तालापसभा क्लिक करा.
सभासदत्व
सभासद वर्गणी रु. १०००/- फक्त भरून संस्थेचे आजीवन सभासद व्हा.
आपण काय करु शकता?
- आपल्या घरांतील शुभ प्रसंगी संस्थेला देणगी द्या किंवा संस्थेची पुस्तके मुलांना व इतर नातेवाईकांना प्रसंगानुरुप भेट द्या.
- संस्कृत भाषा साधना वर्गात प्रवेश घेऊन भाषेची ओळख करुन घ्या व साहित्य साधना वर्गात अभिजात संस्कृत साहित्याचा आस्वाद घ्या.
- संस्कृत भाषा साधना वर्गात शिक्षकाची भूमिका घेऊन संस्थेच्या कार्यात योगदान द्या किंवा “संस्कृत भाषा साधना" वर्गाचे आयोजन करा. ज्ञान प्रसाराचा आनंद मिळवा आणि मिळकतीत भर घाला.
- संस्कृत भाषा स्पर्धा परीक्षेसाठी मुलांची तयारी करुन घ्या. तसेच पठण स्पर्धेचीहि तयारी करुन घ्या व योग्य मोबदला घेऊन आपले मानधन मिळवा.
- भाषा साधना वा साहित्य साधना अभ्यासक्रम पूर्ण करुन, संस्कृत भाषा हा विषय निवडून विद्यापीठाची एम ए पदवी मिळवा. शाळा कॉलेजमध्ये संस्कृत शिकविण्याची वा प्राचीन दस्तावेज साहित्य यांचे भाषांतर करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.
संस्थेची उद्दिष्टे
संस्थेची उद्दिष्टे
संस्थेची उद्दिष्टे
- संस्कृत भाषेची आवड असणाऱ्यांसाठी केवळ ७२ तासांत संस्कृत शिकविण्यासाठी "संस्कृत भाषा साधना” वर्ग जागोजागी व वेळोवेळी चालवून आबालवृद्धांना संस्कृत भाषेत वाचन, लेखन, संभाषण करण्यांस शिकविणे.
- संस्कृत भाषा व संस्कृत साहित्य सर्व स्तरांमध्ये प्रसारित करणे व त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे.
- संस्कृत भाषेच्या अभिवृद्धीसाठी संस्कृत नियत कालिक सुरु करणे.
- संस्कृत साहित्य सहज उपलब्ध व्हावे म्हणून संस्कृत ग्रंथालय चालू करणे.
- संस्कृत भाषेचा प्रसार व प्रचार करणाऱ्या अन्य संस्था व संस्कृतप्रेमी यांच्याशी संपर्क वाढवून कार्याची व्याप्ति वाढविणे.
- संस्कृत भाषेची आवड निर्माण करण्यांसाठी शालेय विद्यार्थी विद्यार्थीनींसाठी खास उपक्रम तयार करुन त्यांची कार्यवाही करणे.
- शालेय अभ्यासक्रमांत संस्कृत भाषा व साहित्य यासाठी महत्वाचे स्थान निर्माण करण्यांसाठी लागणारी पुस्तक निमिर्ती व इतर सुविधा निर्माण करणे. यासाठी आवश्यक ती सर्व मदत या क्षेत्रातील तज्ज्ञ व अधिकारी वर्गाकडूना मिळविणे.
- संस्कृत भाषा प्रसाराचे ध्येय साध्य करण्यासाठी आकाशवाणी, दूरदर्शन व इतर प्रसारमाध्यमे यांची वेळोवेळी मदत घेणे.
प्रकाशने
संस्कृत भाषा संस्थेअंतर्गत अनेक पुस्तके आणि लेख प्रकाशित झाले आहेत. काही निवडक ग्रंथांची यादी येथे देत आहे.
- All
- App
- Card
- Web
Contact
Sanskrit Bhasha Sanstha
c/o Mr. Narendra Joshi
201, Pitruchhaya, Plot No.83,
Sakharam Keer Marg,
Mahim (w),
Mumbai,
India-400016
Contact No: 098337 58745
Our Address
Sanskrit Bhasha Sanstha
c/o Mr. Narendra Joshi,
201, Pitruchhaya, Plot No. 83,
Sakharam Keer Marg, Mahim (W),
Mumbai, India - 400 016
Email Us
संस्कृत भाषा संस्था
[email protected]
Call Us
संस्कृत भाषा संस्था
+91 9833 758 745
